सोलापूर : मंगळवारी, 09 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व निधी 2024 उत्कृष्ठ संकलन केलेल्या कार्यालयांना पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से) सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कुलदीप जंगम (भा.प्र.से), पोलीस आयुक्तएम राजकुमार (भा.पो.से), पोलीस अधिक्षक अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी सन 2024 करीता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे शासनाने दिलेले उद्दीष्ट 01 कोटी 72 लाखाचे असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यांनं 2,17,15, 470 रुपये इतकी रक्कम संकलित करून सैनिक कल्याण विभाग (महाराष्ट्र राज्य), पूणे यांचेकडं वर्ग करून 126.25 टक्के उद्दीष्ट साध्य केले आहे. 

तरी सदरील कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख, जिल्हयातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर पत्नी व वीरमाता-पिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.

