दौला कुमठे 02 जिल्ह्यातून तडीपार

shivrajya patra

सोलापूर : सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करुन दमदाटी करणे, जागेची खोटी कागदपत्रं बनवून गोरगरीब जनतेची घरजागा बळकावणे, घातक हत्याराचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या मेहबूब दौला अब्दूल रजाक शेख उर्फ दौला कुमठे (वय-50वर्षे) याला 02 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय.

शास्त्री नगरातील रहिवासी मेहबूब दौला शेख उर्फ दौला कुमठे याच्याविरुध्द सन २००५, २०१५, २०१८ व २०२५ या कालावधीमध्ये आय.पी.सी. च्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत, असं पोलिसांचं म्हणणे आहे. त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून 02 वर्षाकरीता तडीपार केलं आहे.

To Top