दुष्कर्म करुन बालिकेच्या अमानुष हत्येतील नराधमास द्यावी तात्काळ फाशीची शिक्षा : संभाजी ब्रिगेड

shivrajya patra

       
सोलापूर :  मालेगावमध्ये झालेल्या चिमुरडीशी दुष्कर्म अन् हत्या प्रकरणातील आरोपी नराधम विजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशा अमानुष गुन्ह्यावर अंकुश लावण्यासाठी वा अशा गुन्ह्याची कोठेही पुनरावृत्ती घडू नये, याकरिता कडक कायदे करून अशा आरोपींना कुठलीही दया माया न दाखवता कायद्यामध्ये फाशीची शिक्षा असा गुन्हा घडल्यापासून 30 दिवसाच्या आत देण्यात यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलन केले.

सोलापुरातील चार हुतात्मा चौकात एकत्र आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी निष्पन्न आरोपीच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो करून त्या छायाचित्राची पेटवून देऊन होळी केली. 

या व अशा गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा न दिली व असे गुन्हे परत घडू नये, म्हणून कायद्यात कडक तरतूद नाही केली तर संभाजी ब्रिगेड यापुढे सरकारला धारेवर धरल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. 

यावेळी बबन माने, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडी अॅडवोकेट गणेश कदम, कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर व जिल्हा सचिव सिद्धराम सावळे, महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी,  शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजीवनी सलबत्ते, पूजा कलागते, राधा घुले, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कारंडे, गीता अंजीखाने, विद्या देशमुख, मनीषा डोंगरे, संगीता डोंगरे, सविता मिरगाळे, सिद्धव्वा हत्यानुर, लक्ष्मी किरंगी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top