क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन : संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ

shivrajya patra

जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये महात्मा फुले स्मृतिदिन शिक्षक दिन

उत्तर सोलापूर : ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक ही शाळा उघडली नाही, त्यांच्या नावावर शिक्षक दिन साजरा करण्याऐवजी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचले, त्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे शैक्षणिक योगदान प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच त्यांचा स्मृतिदिन हाच खऱ्या अर्थाने शिक्षक दिन म्हणून साजरा झालाच पाहिजे, असे ठाम मत संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी व्यक्त केले. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिरमध्ये महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांच्या शुभहस्ते प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावीच्या श्रेया सुतार हिने केले. 

यावेळी बाल विद्यार्थी आणि माध्यमिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली शानदार भाषणे केली. त्याचबरोबर विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावी आणि नववी तसेच कॉलेजचा विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गावर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. 

शिक्षक म्हणून काम करत असताना  विद्यार्थी कशाप्रकारे अभ्यास करतात. आणि अभ्यास नाही केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय केले पाहिजे, याची प्रत्यक्ष चाचणी या विद्यार्थ्यांनी शिक्षक या भूमिकेतून स्वतः अनुभवली. अनेक विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश, मराठी आणि हिंदी सर्व विषयांना आपल्या शैलीतून शिकवण्याचा प्रयत्न केला. 

शेवटी समारोप कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे दिवसभरात कार्य केले त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गुंड हिने  केले, तर  नियती वाकचौरे हिने सर्वांचं आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुषमा निळ, मुख्याध्यापिका अर्चना आवरादे, वैभव  मसलकर, आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

To Top