जनता संघर्ष न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सोलापूर : “जनता संघर्ष न्यूज ने समाजातील कष्टकरी, वंचित व पीडित घटकांवरील अन्याय-अत्याचारास आवाज देऊन न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने केले आहे, हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, ” असं प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले.
सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 'जनता संघर्ष न्यूज' चॅनलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका तथा डॉ. प्रा. नसीमा पठाण, दैनिक एकमत चे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, पर्यावरण दूत मनोज देवकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजक सिद्धार्थ भडकुंबे यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर आधारित सादर केलेल्या गीतानं सोहळ्याची सुरुवात झाली.
संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांनी जनता संघर्ष न्यूज चॅनलचा दोन वर्षांचा प्रवास मांडताना, या प्रवासात ज्या ज्ञात-अज्ञाताचं सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं प्रारंभी आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य जनतेच्या हक्कासाठी 'जनता' मुखपत्र सुरू केलं होतं. त्या विचारांचा वसा अन् वारसा जपण्यासाठीचा प्रयत्न आणि एक विचारपीठ मिळावं, म्हणून जनता संघर्ष न्यूज सुरु करण्यात आलंय. जनता संघर्ष 'विचारपीठ जनतेच्या हक्काचं' असं मला एक स्लोगन दिलेलं आहे. यावेळी तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना, आम्हाला अवलोकनाबरोबर आनंदही होतोय, असंही संपादक भडकुंबे यांनी म्हटले.
सिद्धार्थ भडकुंबे यांच्या पत्रकारितेबरोबर त्यांच्यात लपलेला कलाकार सोबत घेऊन समाजाच्या गर्दीत वावरतात, तो कलाकार अन्य कलावंतांना योग्य मंच उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही चॅनलच्या माध्यमातून सेवा म्हणून पार पाडतात, हेही प्रशंसनिय आहे, असंही चेअरमन इंगळे यांनी शेवटी सांगितले.
यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प व रोप देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान गुरववाडीचे सुपुत्र व हैदराबाद येथे कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल माळप्पा पुजारी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय येऊलकर, नसीमा पठाण, मनोज देवकर यांनीही चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संपादक अनिल शिराळकर, श्रीशैल चिंचोळकर, निर्मला गुरव, नितीन करजोळे, सिताराम गायकवाड, अक्षय बबलाद, कीर्तीपाल गायकवाड, संतोष मुगळी, माणिकप्रभू शिंदे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व सामाजिक व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच बहारदार सूत्रसंचालन संपादक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आशा सुतकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
गौरवित मान्यवरांमध्ये
शिवानंद हत्तुरे (युवा उद्योजक)
लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी (आदर्श सरपंच)
इक्बाल गुलाब शेख (पत्रकारिता)
अशपाक शेख (समाजसेवा)
अप्पासाहेब लंगोटे (समाजसेवा)
सचिन जोकारे (आदर्श विमा प्रतिनिधी)
मयूर स्वामी (संगीत रत्न)
दत्तात्रय छत्रे (समाजसेवा)
मल्लिकार्जुन देशमुख (आदर्श शिक्षक)
सर्पमित्र अनिल आलदर (समाजसेवा)
यल्लाप्पा वग्गे (आदर्श बँक व्यवस्थापक)
उमा अकोलकर-माळी (समाजसेविका)
ज्ञानेश्वर पाटील-पुणे) (युवा पत्रकार)
जब्बार शिकलगार (आदर्श शिक्षक)
विजयकुमार चव्हाण-ठाणे (आदर्श अभियंता)
श्रीकांत कोळी (माहिती अधिकार कार्यकर्ता)
डॉ. कीर्ती गोळवलकर (आरोग्यसेवा)
यश खेडे (युवा उद्योजक)
डॉ. निखिल क्षीरसागर (वैद्यकीय सेवा)
मेघा शिवगुंडे (आदर्श महावितरण अभियंता)
औदुंबर बंडगर (आदर्श मुख्याध्यापक)
गंगाधर आप्पा पुजारी-तेलगांव (समाजसेवा)
यांचा समावेश होता.
