गुरूकृपा स्कोडा कार शोरूमचा सोलापुरात शानदार शुभारंभ; विक्री आणि विक्री पश्चात सेवेचा संगम

shivrajya patra

सोलापूर : स्कोडा ऑटो इंडियाच्या वतीने सोलापूरच्या वैभवात मोठी भर घालत गुरूकृपा कार्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर बाळे परिसरात शानदार अद्ययावत अशा स्कोडा कारच्या शोरूमचा शुभारंभ शुक्रवारी, 17 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. स्कोडा कंपनीचे बिझनेस हेड अनिला पेंडसे यांच्या हस्ते या शोरूमचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी लिड नेटवर्क एक्सपान्सशन प्रशांत कुन्नथ आणि सेल्स हेड भुपेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती गुरूकृपा कारचे प्रतिक झंवर यांनी दिली. 

सोलापूरमध्ये फुल्ल-फंक्शन डिलरशीप 2900 चौरस फूट क्षेत्रात पसरलेली आहे. यामध्ये आधुनिक अशा 06 स्कोडा कार डिसप्ले लावण्यात येणार आहेत. 11 हजार 200 चौरसफूट अशा भव्य दिव्य जागेत हे आधुनिक शोरूम उभं करण्यात आलं आहे. इथं विक्री आणि विक्री पश्चात सेवेचा संगम ग्राहकांच्या अनुवण्यास मिळणार आहे, ज्यामुळे सर्व्हिसकरिता 250 कि. मी. ची दगदग  संपली आहे.

ग्राहकांना चांगल्या आणि नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न स्कोडा शो रूमच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र हे राज्य महत्वाचे आहे, त्यातच सोलापूरमध्ये स्कोडाचे क्यलॅक, कुशाक, कोडियाक आणि स्लाव्हियासह अनेक कारचे मॉडेल सोलापूरकरांना या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

आरामदायी तसेच दर्जेदार सुविधांसह प्रवासाचा अनुभव स्कोडा कार मधून मिळतो. त्यामुळेच स्कोडा कारला अधिक पसंती देण्यात येते. त्यातूनच स्कोडा कार विक्री तसेच सर्व्हिसची सुविधा यापुढे सोलापूरमध्ये गुरूकृपा स्कोडामधून मिळणार आहे. असेही झंवर यांनी सांगितले. 130 वर्ष जुनी असलेली स्कोडा भारतात गेल्या 25 वर्षापासून आधुनिक आणि दर्जेदार कारची सेवा देत आहे.

जगभरातील कार प्रेमींचे आकर्षण असलेल्या स्कोडा, फोक्सवॅगन ब्रॅन्डसाठी एमसीबी बॅटरी सिस्टीम इंजिन आणि ट्रान्समीशनसारखे घटक विकसित आणि उत्पादन करते.भारतासह जगभरात कंपनीकडून 40 हजार लोकांना रोजगार मिळत आहे. देशात 179 हून अधिक शहरांमध्ये 315 हून अधिक ग्राहक संपर्क केंद्र स्कोडा कंपनीकडून उघडण्यात आले आहे आता सोलापूरची त्यामध्ये भर पडलेली आहे. ग्राहकांना चांगले उत्पादन आणि चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठी स्कोडा कंपनी नेहमी प्रयत्नशील असते, असंही यावेळी सांगण्यात आलंय.

To Top