निमित्त 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं ! समता सैनिक दलाचे केरू जाधव स्मरणार्थ पुरस्कारांचं धम्म संस्कार सोहळ्यात वितरण

shivrajya patra

सोलापूर : समता सैनिक दलाचे सर्वेसर्वा केरू रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ समता सैनिक दलाच्या वतीने  69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने गुरुवारी, 02 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 07 वा. धम्म संस्कार सोहळा नोर्थकोट प्रशाला सोलापूरच्या मैदानावर आयोजित केला आहे. या सोहळ्यात समता सैनिक दलाचे केरू जाधव स्मरणार्थ पुरस्कार जाहीर झालेल्या पुरस्कारांचं वितरण होईल. या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये योगीराज वाघमारे, भालशंकर, सुभान बनसोडे, अण्णासाहेब भालशंकर, डॉ. औदुंबर मस्के, सुनिता अरुण गायकवाड आणि धम्मरक्षिता कांबळे यांचा समावेश आहे.

या धम्म संस्कार सोहळ्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, कामगार क्षेत्रामध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना केरू रामचंद्र जाधव स्मरणार्थ विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक योगीराज वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कार 

तर कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभान बनसोडे यांना संत गाडगेबाबा जीवनगौरव पुरस्कार 

तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शैक्षणिक कार्य पुरस्कार, 

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. औदुंबर मस्के यांना "जीवक "जीवन गौरव पुरस्कार, 


बौद्ध धम्माच्या चळवळीमध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धम्मरक्षिता कांबळे यांना भगवान गौतम बुद्ध जीवनगौरव पुरस्कार 

त्याचप्रमाणे सुनिता अरुण गायकवाड यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शैक्षणिक कार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 

पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या धम्म संस्कार सोहळ्यात सायंकाळी ठीक 07 वाजता मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, शाल, वृक्षाचे रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

तरी या मान्यवरांना गौरविण्यासाठी आणि धम्म संस्कार सोहळ्यासाठी  हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव, महासचिव अनिल जगझाप, खजिनदार सुनील डांगे, मुकुंद चंदनशिवे, मंजुश्री खंडागळे इत्यादींनी केलं आहे.

To Top