पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ना. अजित पवार यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सन 2006 ते 2018 या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं.
पुणे येथे 21 सप्टेंबर रोजी झालेल्या शासकीय परिषद सभेत तसेच शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-पुणे येथे रविवारी, 28 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वार्षिक
सर्वसाधारण सभेत ना. अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील होत्या.
यापूर्वी अध्यक्ष असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त अध्यक्षस्थानी शासकीय परिषदेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेतही ना. अजित पवार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी सांगितले.
