काम करणाऱ्यांना पुरस्काराने प्रेरणा मिळते : माजी शिक्षक आमदार सावंत

shivrajya patra

बहुजन शिक्षक महासंघाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण 

सोलापूर : अनेक अडचणीवर मात करून विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य शिक्षक अविरतपणे करीत असतात. अशा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविणे हे बहुजन शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळते, असे सांगत 01 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 2013 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना' टी ई टी उत्तीर्ण व्हा, अन्यथा सेवा समाप्ती'  या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन प्रसंगी रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.  

ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या शिवस्मारक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते. 


यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सरवदे, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, जैन गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव, समता सैनिक दलाच्या जिओसी सुमित्रा जाधव, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे, राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हाध्यक्ष प्रा.युवराज भोसले, नवनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सिद्राम मुली यांचे अभंग गायन तर शांतीनिकेतन शाळेची विद्यार्थिनी कु. अनुभा शिवशरण हिच्या कथ्थक नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, बहुजन शिक्षक महासंघाच्या परिवारातील शिक्षकांना आणि पत्रकारांना मिळणारा पुरस्कार हा केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता, सत्व, तत्त्व, राष्ट्राप्रतीची एकनिष्ठतेच्या असलेल्या पाऊलवाटेचा सन्मान आहे, असे विचार मांडले. याप्रसंगी गुरुनाथ वांगीकर, राजकुमार काळे तसेच सत्कारमूर्तींच्या वतीने किरण बनसोडे व प्रतिभा पांडव यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. युवराज भोसले यांनी केले. सत्कारमूर्तींचे यादी वाचन जिल्हा महिला प्रतिनिधी निर्मला मौळे यांनी केले तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.

सत्कार समारंभात प्रारंभी  सेवानिवृत्त झालेले सभासद वैजिनाथ लोखंडे, प्रा.युवराज भोसले, शिवाजी जगताप, राजकुमार वसेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर यांचा झाला सन्मान...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार

किरण बनसोडे, उपसंपादक- दैनिक तरुण भारत, सोलापूर, किशोर सोनवणे मुख्य संपादक: P.M. News १९६६ वैराग, ता. बार्शी, जि.सोलापूर.

तथागत भगवान गौतम बुध्द विशेष जीवन गौरव पुरस्कार

रत्नदीप कांबळे (संचालक-सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था, नवयान अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी, सोलापूर)

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार

प्राचार्य अमोल ढेपे (श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला बाळे, ता. उत्तर सोलापूर), प्राचार्य आप्पासाहेब काशीद (श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगांव ता. सांगोला), प्राचार्य शरद सांवत (माळशिरस प्रशाला,  माळशिरस), महेंद्र  शिंदे (मुख्याध्यापक : शारदा-सिध्दनाथ विद्यामंदिर  पाटखळ ता. मंगळवेढा), राजनकुमार पौळ (सहशिक्षक-प्रगती विद्यामंदिर मांगी ता. करमाळा), बलभीम हांडे (सहशिक्षक-तांबोळे विद्यामंदिर तांबोळे, ता. मोहोळ), धनाजी धिमधिमे (क्रीडा शिक्षक-शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय घाणेगांव, ता. बार्शी), भीमराव नवगिरे (सहशिक्षक -श्री विठ्ठल प्रशाला वेणुनगर, ता. पंढरपूर), अंकुश जाधव (सहशिक्षक- आ. बबनराव शिंदे प्राथमिक शाळा कुडूवाडी, ता. माढा), गंगाधर शिवशरण (सहशिक्षक- नूतन विद्यालय मंगळूर (पान) ता. अक्कलकोट

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 

मंजुश्री खंडागळे (मुख्याध्यापिका -राष्ट्रसंत प्राथमिक शाळा, सोलापूर), प्रतिभा पांडव (सहशिक्षिका- मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव ता. माढा

राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार

शिवाजी थिटे (वरिष्ठ लिपिक- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय अनगर ता. मोहोळ), मुस्ताक शेतसंदी (वरिष्ठ लिपिक- महात्मा फुले विद्यालय मंद्रुप ता.द. सोलापूर), सुनिल सगरे (लिपिक- सिल्व्हर ज्युबिली प्रशाला, बार्शी), कैलास माने (सेवक- विश्वभूषण विद्यालय, सोलापूर) यांचा समावेश होता.

पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तींचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, बुके व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी जगताप, प्रफुल्ल जानराव, दत्तात्रय शिंदे, नितीन गायकवाड, निर्मला मौळे, सुशिलचंद्र भालशंकर, , इन्नुस बाळगी, महिबूब तांबोळी, सिद्धेश्वर भुरले, विदूर शेळके,  विष्णू लादे आदींनी परिश्रम घेतले.

To Top