– विनोदी आणि भावनिक कथा यांचा अनोखा संगम
भारतातील प्रेक्षकांचे आवडते एंटरटेनमेंट डेस्टिनेशन प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी ओरिजिनल सिरीज ‘रंगीन’ची स्ट्रीमिंग तारीख जाहीर केली आहे. ही सिरीज २५ जुलै २०२५ रोजी भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
‘रंगीन’ ही एक हलकीफुलकी, भावनिक आणि विचार करायला लावणारी सिरीज आहे, ज्यामध्ये प्रेम, नातेसंबंध आणि आत्मचिंतन यांचा सुरेख मिलाफ आहे. ही सिरीज कबीर खान आणि राजन कपूर यांनी निर्मित केली असून कथा अमरदीप गलसिन आणि आमिर रिझवी यांनी लिहिली आहे. दिग्दर्शन कोपल नैथानी आणि प्रांजल दूआ यांनी केले आहे. मुख्य भूमिका साकारल्या आहेत प्रसिद्ध अभिनेते विनीत कुमार सिंह, राजश्री देशपांडे, तारुक रैना आणि शीबा चड्ढा यांनी.
कथासार
‘रंगीन’ ही कथा आहे आदर्श नावाच्या एका सरळसाध्या व्यक्तीची, ज्याचे आयुष्य एका क्षणात बदलते, जेव्हा त्याला आपल्या पत्नी नैना हिच्या बेवफाईची माहिती मिळते. यानंतर जे घडते, ते हसवणाऱ्या प्रसंगांनी आणि धक्कादायक वळणांनी भरलेले आहे. या प्रवासात आदर्श आपलं प्रेम, मर्दानगी आणि नैतिकतेच्या कल्पनांना प्रश्न विचारतो.