सेवानिवृत्त उप-अभियंता लियाकत शेख यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : येथील सर विश्वेश्वरय्या सोसायटीतील (जुळे सोलापूर) रहिवासी पाटबंधारे विभागातील  निवृत्त उप-अभियंता हाजी लियाकत अ. रऊफ शेख यांचे अल्पशः आजाराने गुरुवारी निधन झाले. ते मृत्यू समयी ७२ वर्षीय होते.                     

त्यांच्या पार्थिवावर जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ४ मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते ॲड. खिजर शेख यांचे वडील तर पत्रकार अखलाक शेख यांचे थोरले बंधू होत. 

To Top