'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' या सोनी टीव्हीवरील मालिकेची टीम करणार अजमेरच्या ऐतिहासिक तारागड किल्ल्याला भेट

shivrajya patra

४ जूनपासून सुरू होणार मालिका

शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अजमेरच्या पवित्र भूमीवर, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील आगामी ऐतिहासिक मालिका ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ चा भव्य प्रचार होणार आहे. मालिकेच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून, मुख्य कलाकार रोनित रॉय आणि बालकलाकार उर्वा सवालिया ७ जून रोजी अजमेरच्या प्रतिष्ठित तारागड किल्ल्याला भेट देतील.

पृथ्वीराज चौहान यांची कथा अनेक वर्षांपासून प्रामुख्याने राजकुमारी संयोगितासोबतच्या त्यांच्या प्रेमकथेभोवती फिरत आली आहे. मात्र ही नवीन मालिका त्यांच्यावर एका नवीन दृष्टिकोनातून प्रकाश टाकणार आहे. मालिकेत त्यांच्या धैर्यशील नेतृत्व, शहाणपण आणि युद्धनितीवर भर दिला जाईल – विशेषतः १२व्या शतकात मोहम्मद घोरीविरुद्ध लढलेली ऐतिहासिक निर्णायक लढाई.

सोनी टीव्हीवर ४ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेच्या प्रचारासाठी, कलाकारांची टीम ७ जून रोजी जयपूरहून अजमेरकडे रवाना होणार आहे. तारागड किल्ला हा पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे, त्यामुळे या दौऱ्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. रोनित रॉय आणि उर्वा सवालिया या दौऱ्यातून प्रेक्षकांशी संवाद साधतील आणि मालिकेतील ऐतिहासिक घटनांची माहिती देतील, जेणेकरून प्रेक्षक त्या महान योद्ध्याच्या जीवनाची आणि संघर्षाची खोलीने अनुभूती घेऊ शकतील.

ही मालिका अत्यंत भव्य सेट्सवर शूट करण्यात आली आहे. सेट सहा विभागांत विभागले गेले असून, त्यामध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनातील विविध टप्प्यांचे दर्शन घडते-जसे की राजमहाल, युद्धभूमी, अंगण आणि किल्ल्याचे परिपूर्ण दृश्य. प्रेक्षकांना त्या काळाचा अनुभव मिळावा, यासाठी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले गेले आहे. चित्रिकरण सुरू करण्याआधी एक ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ यांनी सेटची पडताळणी करून त्यास मान्यता दिली.

१२ व्या शतकातील राजपूत सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित ही मालिका, त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि मोहम्मद घोरीविरुद्ध केलेला संघर्ष यांची कहाणी सांगते. निर्मात्यांनी सेट डिझाईन, पारंपरिक पोशाख, संवाद आणि युद्धाचे दृश्य यामध्ये जास्तीत जास्त वास्तवतेचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

युद्धातील भव्य दृश्ये, ऐतिहासिक पार्श्वभूमी, अनुभवी कलाकारांचा कसदार अभिनय आणि खोल संशोधनासह ही मालिका प्रेक्षकांना भारतीय इतिहासातील एका गौरवशाली पर्वाशी जोडून देणार आहे. ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही मालिका ४ जूनपासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर आणि SonyLIV वर प्रसारित होणार आहे.

To Top