सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाने आजचं जग प्रगतीची उंच शिखर गाठत असताना, चोऱ्या करण्याचे तंत्रही बदलत चाललेलं आहे. नकली पोलीस, सीआयडी ऑफिसर असल्याच्या शापा मारून सायबर गुन्हेगार सामान्य जनतेला लाखोंचा चुना लावत आहेत, अशा सायबर गुन्ह्यात स्वतःची फसवणूक टाळावी अथवा फसला तर 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन केंद्र शासन क्षणाक्षणाला करीत आहे. अशातच अज्ञात चोरट्यानं गांधी यांची सुमारे 25 हजार रुपये किंमतीची कुत्री चोरून नेलीय. या गुन्ह्यात चोरी गेलेल्या कुत्रीचा शोध जणू स्थानिक पोलिसांसमोर आव्हानच मानला जातंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील मोदीखाना परिसरातील उत्तरा बंगला मधील रहिवासी हर्षवर्धन शांतनु गांधी यांच्याकडील पाळीव काळा-पांढरा ब्राऊन रंगाची कोको नावाची कुत्री अज्ञात चोरट्यानं चोरुन नेली. हा प्रकार शनिवारी, 31 मे रोजी दुपारी घडलाय. या घटनेत चोरीस गेलेल्या कोको, 25 हजार रुपये किंमतीची असल्याचं सांगण्यात आलंय.
या प्रकरणी हर्षवर्धन गांधी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द भा. न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार सरतापे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
