सोलापूर : हल्ली पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने वृक्ष लागवड करून त्याच संवर्धन करणे उद्याच्या समृध्द मानवी जीवनासाठी काळाची गरज बनली आहे. शासन, अनेक सेवाभावी संस्था पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपापल्या परीनं योगदान देत आहेत. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मंगळवारी सोलापूर-तुळजापूर महामार्गावर 'एक पेड, माँ के नाम' उपक्रम राबऊन रोपट्यांची लागवड करण्यात आली.
सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाणे, IRB infrastructure Devlopers limited आणि sanvi infra solution यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीत उळेगांव नजिक 'एक पेड, माँ के नाम' उपक्रम राबऊन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-येडशी या साखळी क्रमांक ०९+०५० LHS ला वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास उळेगांवचे सरपंच, उपसरपंच नेताजी खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.
यावेळी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, IRB चे एपीएस मुरूगन, ए. पी. कदम, आय. जे. तावडे, राजेंद्र शाव, जे. बी. सावंत, तुकाराम सावंत, सान्वी इन्फ्रा सोल्युशनचे गहिणीनाथ गवळी, निखील कुलकर्णी, शिवराम कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.