सोलापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावळेश्वर ग्रामपंचायत व डॉ. आंबेडकर student युथ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात 70 मुला-मुलींची निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांचा सोलापूर ते पुणे प्रवास लागणारा खर्च पोफळी गावचे नामदेव पाटील करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोहोळ तालुक्यातील मौजे सावळेश्वर येथे दि. 26 जून रोजी ग्रामपंचायत वतीने सावळेश्वर गावच्या विकासाचा ध्यास अन् बेरोजगारीची चिंता असलेले सरपंच सखाराम साठे यांनी तळमळीने पुढाकार घेऊन हा रोजगार मेळावा यशस्वी केला. 
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी टाटा मोटर्स व फाँट मोटर्स च्या वतीने वाघमोडे हे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे संस्थापक उत्तम नवघरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या मेळाव्यास Dolopma धारक विद्यार्थी ITI चे दोन वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थी व आर्ट व सायन्समधून 12 वी उतीर्ण झालेले विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पात्र 70 मुला-मुलींची निवड टाटा मोटर्स व फाँट मोटर्स मध्ये ट्रेनिंग इंजिनियर म्हणून निवड करण्यात आली. सावळेश्वर चे समाधान साबळे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला मोहोळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे धनाजी गावडे, माजी सरपंच कालिदास गावडे, श्रीकांत टेकाळे (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य समाधान गावडे, ग्रामसेवक प्रभाकर गावडे, शंकर साबळे, नागेश साबळे, दयानंद साबळे, अजित साबळे, वर्षकेतू साबळे व डॉ. आंबेडकर student असो. चे किरण पोरवे, ऋषिकेश मलोर आदि उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद साबळे, अमर साबळे, महादेव साबळे, नितीन साबळे, सागर साबळे, विशाल जाधव, सिद्धार्थ साबळे, विश्वजीत जाधव, दशरथ साबळे, महावीर साबळे, अमित साबळे, अभिजित साबळे, रितेश साबळे व ब्रदर्स ग्रुप सावळेश्वर यांचं मोलाचं सहकार्य लाभले.
