" शाक्य संघ ," शौर्य विजयस्तंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेसह विविध संघटनांची महामाता रमाईंना अभिवादन

shivrajya patra

पुणे : महामाता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी मंगळवारी, २७ मे रोजी येथील वाडिया कॉलेजजवळील माता रमाई यांच्या पुर्णाकृति पुतळ्यास नियोजित " शाक्य संघ ," शौर्य विजयस्तंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे, यांच्याकडून मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.

नियोजित " शाक्य संघ‌‌‌ ," सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने  पुणे येथील महामाता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी येथील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमामध्ये  अशोककुमार दिलपाक (नियोजित-शाक्य संघ, संघटक व सल्लागार महाराष्ट्र राज्य.), विठ्ठल गायकवाड  (समन्वयक माता रमाई सामाजिक ट्रस्ट, पुणे), सुनील वारे (बार्टी महासंचालक, पुणे),   परशुराम वाडेकर, वृषाली रणधीर (प्राचार्या वाडिया कॉलेज, पुणे) लता राजगुरू (माजी नगरसेविका, पुणे) यांनी महामाता रमाई यांच्या स्मृतिदिनी मनोगत व्यक्त केले.



याप्रसंगी सुभाष सर्वगोड (अध्यक्ष-शाक्य संघ ," शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुणे), बाबासाहेब माने, गोविंद जगताप, कैलास रणपिसे, रमेश शिंदे (सेवानिवृत्त कारागृह पोलीस), महादेव आठवले, विजय सरावते, नामदेव मुनतोंडे , रमेश ओव्हाळ, कल्लप्पा तेरदाळ,अशोककुमार शेलार, रंजना रणपिसे, मनीषा कोरके, छाया वाघमारे यांच्या बहुसंख्य बौद्ध उपासक व बौद्ध उपासिका तसेच इतर समाजातील महिला व स्त्री पुरुष उपस्थित होते.

To Top