सोलापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरची कन्या वैष्णवी राम गायकवाड ही मुलीत राज्यात प्रथम आली.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु. म. वि. शाळेत, माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर तर अभियांत्रिकी शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून झालं आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्षी दि बाटू विद्यापीठ मध्ये प्रथम आली होती. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची सुकन्या आहे.