... येत्या काळात इथल्या तरुणाईला रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावं लागणार नाही : दुबई दौऱ्यानंतर आमदार देशमुख यांचा विश्वास

shivrajya patra

सोलापूरच्या विविध क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाची दुबई भेट

दुबईस्थित उद्योजकांची दर्जात्मक उत्पादन देण्याच्या अटीवर सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी सकारात्मक भूमिका

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांचा पुढाकार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनांना दुबई येथील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेले आहे. या दौऱ्यातील संवादातून सोलापूरच्या उत्पादनाला तिथल्या बाजारपेठेत संधी आहेत. येत्या काळात इथल्या तरुणाईला रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावं लागणार नाही,असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील उद्योजकांचे एक आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ दुबई दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातील संवाद आणि व्यावसायिक संधीच्या अनुषंगाने सोमवारी आमदार देशमुख पत्रकारांशी बोलत होते.

आमदार देशमुख म्हणजे एक विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्यामुळेच विविध क्षेत्रातील उद्योजक एकत्र येऊन एक शिष्टमंडळ तयार करून दुबईला भेट देणे शक्य झाले आहे. यामुळे युवा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय मार्केटही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सहकार्य होणार आहे. यामुळे देखील काही उद्योजक आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास सक्षम होणार आहे. त्याचे श्रेय केवळ देशमुख यांना जाईल, असे मत शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी प्रारंभी व्यक्त केले.

यातील काही उद्योजक कधीच भारताबाहेर गेलेले नव्हते. त्यांना दुबई भेटीदरम्यान एक चांगला अनुभव घेता आला. महाराष्ट्रातील हे असे एकमेव उदाहरण असेल जे सोलापुरातील उद्योग वाढीसाठी शिष्टमंडळ तयार करून दुबईला घेऊन जाणारे पहिले नेतृत्व असलेले राजकारणी आमदार सुभाष देशमुख असतील. ज्यांनी युनिफॉर्म गारमेंट, चादर, टॉवेल, आयटी क्षेत्र, सायबर सिक्युरिटी, कृषी उत्पादन, बचत गटांचे उत्पादने अशा विविध क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधीचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दुबईला गेले.

दुबई दौऱ्यातील शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी-

सेक्युरिटी बिझनेस हेड संतोष कोरट दुबई.

दुबई भेटीदरम्यान अनेक मान्यवरांची भेट झाली. दरम्यान आय बी एम ऍक्रॉस गल्फ आफ्रिका अँड इजिप्तचे सायबर सेक्युरिटी बिझनेस हेड संतोष कोरट यांच्याशी चर्चा झाली की, सोलापूर येथे आयटी क्षेत्रात कशा पद्धतीने काम करतायेत. सायबर सिक्युरिटी मध्ये सोलापूरचे आयटी हब कसे निर्माण करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. उद्योग वाढीसाठी सोलापूर दुबई फोरम तयार करण्याचे ठरले.

कृषी उत्पादनांना बाजारपेठ जुई केमकर, जितेन दमानिया दुबई.

दुबई येथील जुई केमकर व जितेंन दमानिया हे फूड सेक्टरमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करत असून सोलापूरच्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठी यावेळी चर्चा सकारात्मक झाली. उद्योजकांनी सोलापूरच्या उत्पादनांचे सॅम्पल यांना दाखवले. या दोघांनी कृषी उत्पादनांना मोठे बाजारपेठ मिळवून देण्याची ग्वाही दिली.

दुबई येथील जागतिक पातळीवरील "टेक्समास" संस्थेला भेट

सोलापूरच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळांनी दुबई येथील टेक्सस्टाईल सिटीतील टेक्समास टेक्स्टाईल मर्चेंट्स ग्रुपला भेट दिली. टेक्समास भारत, चीन आणि युरोप यासारख्या देशाशी आयात-निर्यात संबंध अगदी घनिष्ठ आहेत. टेक्समास सचिव सचू मानवाणी, सहसचिव किशोर सलवाणी यांनी सोलापूरच्या उद्योग जगांशी दीर्घकालीन भागीदारी सकारात्मक प्रतिसाद दिला.

युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चर

ही भेट दुबई आणि सोलापूर मधील व्यापार सहकार्याचे नवे द्वार खुले करणारी असून दोन्ही बाजूंना वस्त्र उद्योगातील निर्यात गुंतवणूक आणि कौशल्य विनिमयाच्या नव्या संधी देणारी ठरणार आहे. सोबतच बैठकीला युनिफॉर्म व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून कसे विकसित करता येईल, त्याच्या दिशा व शक्यता आणि धोरणात्मक भागीदारी यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. 

या भेटीदरम्यान गारमेंट उद्योजकाची गुणवत्ता उत्पादन क्षमता याची माहिती देखील देण्यात आली, विशेष म्हणजे दुबईतील टॅक्सी ड्रायव्हरच्या गणवेशाचे उत्पादन सोलापूर मधीलच असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अबुधाबी येथील जितेंद्र वैद्य

इंडियन पीपल फोरमचे अध्यक्ष अबुधाबी येथील जितेंद्र वैद्य यांनी या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी दुबई येथील नागरिकांचे संघटन करणे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करतात सोलापूरच्या व्यवसायिकांना या माध्यमातून उद्योजकांचे शिष्टमंडळ वेळोवेळी दुबईला येऊन भेट देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दुबई येथील वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या उद्योगांच्या संधी कशा उपलब्ध होतील, ते पाहूयात असं आश्वासन दिले.

सोलापूरसाठी डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना संधी सागर कुलकर्णी

दुबई स्थित सागर कुलकर्णी यांनी डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्याप्रमाणे ते काही दिवसातच सोलापूर दौरा करून रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे सोलापूरच्या कौशल्याला जगभरात स्थान मिळण्यासाठी संधी मिळणार आहे. सागर कुलकर्णी हे बांधकाम ऑटोमेशन डिझाईन व्यवसायत मोठ्या प्रमाणात दुबई सारख्या विकसित देशात आपला ठसा उमटविलेला आहे.

अबुधाबी येथील BAPS-स्वामीनारायण मंदिराला भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे फलित म्हणजे हे BAPS-स्वामीनारायण मंदिराकडं पाहिलं जातं. मंदिराचे निर्माण भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा गौरव जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सर्व भक्तांना प्रेम शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणारे अबू धाबी येथील हे मंदिर निश्चितच एक प्रेरणादायी ठिकाण आहे. अबुधाबी येथील हे पवित्र बीएपीएस स्वामीनारायण मंदिर म्हणजे भव्य भारतीय संस्कृती स्थापत्यकला आणि अध्यात्मताचे अद्वितीय संगम आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक विलक्षण अध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळाली असल्याचे सर्व प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले.

दुबईतील सर्व सोलापूरकर एकत्रित

सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या विविध उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मान्यवरांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. आपण सोलापूरच्या मातीतून उभे राहून जागतिक पातळीवर उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे, तेव्हा आता सोलापूरच्या वैभवासाठी एकत्र येण्याची व त्याला विकासासाठी हातभार लावण्याची आता गरज निर्माण झाली आहे, भावना त्यांनी व्यक्त केली. चला आपण सर्व एकत्र येऊ आणि सर्व उद्योग पुढे घेऊन जाऊ आणि सोलापूरच्या स्वप्न साकार करूया, असे आवाहन देशमुख यांनी केले.

दुबई येथील विद्यालयाचे कार्यकारी संचालक आनंद सूर्यवंशी आणि युनिफॉर्म गारमेंटवर चर्चा

दुबई शहरात एकूण 250 पेक्षा जास्त महाविद्यालये असून यातील विद्यार्थी यांच्या गणवेशासाठी सोलापूरचे युनिफॉर्म कसे विकत घेता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली. युनिफॉर्म गारमेंट यशस्वीरित्या सर्व शाळेत पोहोचण्यासाठी सामुहिक प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिले.

तसेच सोलापूरच्या बॅग उत्पादकांनी नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्युशन देखील यावेळी सादर केले. या उत्पादनांच्या गुणवत्ता व पारंपारिकतेचे कौतुक त्यांनी केले. त्यांच्या खरेदी व्यवस्थापन टीमसोबत देखील यावेळी चर्चा झाली.

अल अदिल ट्रेडिंगचे धनंजय दातार

दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंगचे धनंजय दातार हे चेअरमन आहेत. त्यांनी सोलापुरातील खाद्यपदार्थ आणि इतर पारंपारिक व दर्जेदार कृषी उत्पादने यावर चर्चा केली. त्यांनी ही दर्जेदार उत्पादने विकत घेण्याचे आश्वासन दिले. अल अदिल ट्रेडिंग हे मध्य-पूर्वेतील मसाले व अन्नधान्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य वितरक आहेत.

दातार यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक वारशाचे व उद्योजकीय क्षमतेचे विशेष कौतुक केले. ही भेट स्थानिक उत्पादकासाठी निर्यात संधी निर्माण करणारी ठरली असून भारत व यूएई यांच्यातील व्यापार संबंध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शारजाह येथील रिसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्क

आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दुबईतील शारजाह येथे शारजाह रीसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्कला भेट देण्यात आली. या दौऱ्यात गव्हर्नमेंट संशोधन आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या विविध संधीचा अभ्यास करण्यात आला. यावेळी संस्थेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यासह दुबई स्थित उद्योजकासोबत व्यापार गुंतवणूक व स्टार्टअप साठी सरकारच्या संधीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

युनिफॉर्म उत्पादनात उल्लेखनीय कार्य करणारे मॅथ्यू सुभाष

दुबईस्थित डिझाईन टेक्स ही अग्रगण्य कंपनी युनिफॉर्म उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून विविध उद्योगासाठी दर्जेदार व व्यावसायिक युनिफॉर्म तयार करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. डिझाईन टेक्स ग्रुपचे चेअरमन म्हणून मॅथ्यू सुभाष हे काम पाहतात. त्यांची भेट घेण्यात आली. आणि युनिफॉर्म गारमेंट उद्योग वाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

या शिष्टमंडळाच्या माध्यमातून दुबईतील अनेक उद्योजकांच्या प्रमुखांची भेट झाली. जवळजवळ 30 ते 32 उद्योजकांची सकारात्मक चर्चा झाली. डे टू डे स्टोअर्स, बिगमार्ट, हायपर मार्केट, चिटग्राम फूड मार्केट, इत्यादी अशा वेगवेगळ्या मोठ-मोठ्या उद्योजकांच्या प्रमुखांशी चर्चा अगदी सकारात्मक झालेली असून उद्योग वाढीसाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. 

या सर्वांचे सँपलींग करून दुबईला निर्यात करण्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाली. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून सोलापूर दुबई बिजनेस फोरम तयार करण्याचे ठरले. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही उद्योजकाला सोलापुरातून दुबईला जायचं असेल तर त्याला लागणारी काही मदत असेल तर हे फोरम सर्वतोपरी मदत करेल, असं आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

** दुबई दौऱ्यातील सहभागी उद्योजक शिष्टमंडळ **

आमदार सुभाष देशमुख-संस्थापक अध्यक्ष सोलापूर सोशल फाउंडेशन

अमित जैन- संचालक, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन

डॉ. राजेश गुराणी-सीईओ, उद्यम फाउंडेशन, सोलापूर विद्यापीठ

विजय पाटील-मुख्य समन्वयक, सोलापूर सोशल फाउंडेशन

युनिफॉर्म अँड गारमेंट्स विभाग-प्रकाश पवार, प्रशांत राठी, देव जैन, श्रीनिवास बासूतकर, अभिजीत मालानी, विवेक सोनथालिया,

मेन्स वेअर आणि ट्राऊझर विभाग-यश रंगरेज, महेश रच्चा.

फूड ग्रेन्स विभाग-अल्पेश संकलेचा, प्रदीप जैन, यश जैन

होम टेक्स्टाईल आणि टॉवेल्स विभाग-सागर गड्डम, मुरलीमोहन बुरा

बॅग्स मॅन्युफॅक्चर - आनंद झाड.

To Top