Type Here to Get Search Results !

नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्दिलक्षी अभ्यासक्रमात होणार बदल

सोलापूर : शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार असून इयत्ता 1 ली पासून टप्या टप्याने अभ्यासक्रम बदलत जाणार आहे. याच अनुषंगाने प्रचलित 12 वी द्विलक्षी  अभ्याक्रम बदलून NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क - ही एक राष्ट्रीय स्तरावरची कौशल्य व ज्ञान आधारीत प्रणाली तयार करण्यात आली. 

यामध्ये विविध चार पातळ्यांवर (इ. 9 वी ते 12 वी पर्यंत अनुक्रमे लेव्हल 1 ते लेव्हल 4) पात्रता ठरते. या प्रणाली अंतर्गत विविध सेक्टरमधील आवश्यक स्किल नुसार जॉब रोल बनविण्यात आलेला आहे . या जॉबरोलचा अभ्यासक्रम बनविताना देशांतर्गत औद्योगिक मनुष्यबळाची गरज तसेच जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेतलेली आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर समान कौशल्य प्राप्त असलेले कुशल मनुष्यबळ तयार होईल. यातून औद्योगिक गरजेनुसार उपलब्ध कौशल्य प्राप्त सुशिक्षित व पात्र तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील. 

अभियांत्रिकी मधुन करीअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमांतर्गत सुरू होणारे नवीन जॉब रोलवर आधारीत अभ्याक्रम आपल्या आवडीनुसार व संस्थेतील उपलब्धतेनुसार निवडता येतात. यामुळे त्यांना भविष्यात देशांतर्गत तसेच विदेशात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. 

अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विभागांतर्गत स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच अनेक देशांशी कुशल मनुष्यबळ पुरवठा करण्यासंबंधी सामंजस्य करार सुध्दा झालेले आहेत.

महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय (नॉर्थकोट) ही शहरातील मध्यवर्ती, सुसज्ज व ब्रिटिश काळापासून तांत्रिक शिक्षण देणारी शहरातील एकमेव शासकीय संस्था आहे. या प्रशालेत 9 वी 10 वी तांत्रिक तसेच 11 वी 12 वी (द्विलक्षी अभ्यासक्रम) या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.

नविन शैक्षणिक धोरणानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने या प्रशालेचे पुर्णवेळ शाळेतून केंद्रशाळेत रुपांतरण करण्यात आलेल आहे. यामुळे शहरातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना अनुक्रमे . इ.09 वी व इ.11 वी च्या इच्छुक विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाचा लाभ मिळवून देण्याकरीता या प्रशालेसोबत संलग्नता मिळविता येते. 

संलग्नता मिळविण्या करीता कसलेही प्रकारचे शुल्क आकारले आत नाही. इ. 09 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना हिंदी अथवा समाजशास्त्र या विषयास पर्याय म्हणून एक तांत्रिक विषय निवडता येतो. 

तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, भौतिक, रसायनशास्त्र व गणित या विषयासोबत दोन तांत्रिक विषय (जॉबरोल) निवडता येतात. सदरचे तांत्रिक विषय शिकविण्याची संपुर्ण जबाबदारी (सैध्दांतिक व प्रात्यक्षिक) ही या प्रशालेवर  असून, सहभागी शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षक किंवा कार्यशाळा करणेची कसलीही आवश्यकता नाही.

विद्यार्थ्यांना ठराविक दिवशी या शाळेत उपस्थित राहून प्रशिक्षण घेता येते. तांत्रिक विषयासोबत इ.10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अनेक सवलती व संधी प्राप्त होतात. तांत्रिक विषयातून इ.09वी/11 वी प्रवेश घेण्याकरीता खालील सहभागी शाळा व  महाविद्यालयांना संपर्क करावा.

छत्रपती शिवाजी प्रशाला, सोलापुर मुरारजी पेठ, सोलापुर,  बालभारती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कुमठा नाका, मोलापूर,  सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला, गणपती घाट, सोलापूर,  बालभारती कनिष्ठ महाविद्यालय, कुमठा नाका, सोलापूर,  के. सौ. अलकनंदा जोशी ज्युनिअर कॉलेज, जुळे सोलापूर,  इंडियन मॉडेल ज्युनिअर कॉलेज, अक्कलकोट, सोलापूर.

या प्रसिध्दीपत्रकाव्दारे नविन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना आवाहन करण्यात येते की, आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारीत तांत्रिक शिक्षण मिळवून देण्याकरीता उपलब्ध संधीचा लाभ घेण्याकरीता संपर्क करावा. असे आवाहन मुख्याध्यापक, महाराष्ट्रराज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा, सोलापूर अमर जाधव यांनी केलं आहे.

अमर जाधव (मुख्याध्यापक) 9028952595, शिंदे बी एम. 9423577764,  बोनाकृती आर. एस. 8446166897