सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा, यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नगरसेविका नुतन गायकवाड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार बोलत होते.
जात-पात, धर्म-पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशात सामाजिक कार्य पार पाडण्यात आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या तसंच देशभर रस्ते, देऊळ, विहिरी, तलाव, नदी घाट, धर्मशाळेसारख्या सुविधा निर्माण करून लोकोपयोगी कामांना कायम प्राधान्य देणाऱ्या प्रजाहीतदक्ष राज्यकर्त्या, कर्तृत्ववान शासनकर्त्या होत्या, असंही पवार यांनी यावेळी म्हटले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, हेमंत चौधरी, जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलिम नदाफ, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, सहकार अध्यक्ष भास्कर आडकी, चित्रपट सांस्कृतिक सेल अध्यक्ष अशितोष नाटकर, सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे, ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद, ओबीसी कार्याध्यक्ष अय्युब शेख, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी, रिक्षा चालक मालक सेल महपती पवार, सेक्रेटरी दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, सुरेखा घाडगे, कविता पाटील, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
