लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने अभिवादन
सोलापूर : भारतीय इतिहासातील कर्तुत्ववान महिला शासकात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. कौटुंबिक अनेक समस्येवर मात करीत प्रजाहितदक्ष काम करीत होत. विशेष करून प्राणी पक्षी यांच्यासाठी औषधी वने तयार करून मानव हिताबरोबर प्राणिमात्रांची काळजी घेणाऱ्या प्रशासक होत्या, असं प्रतिपादन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले. 
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीदिनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. यावेळी हाजी मतीन बागवान बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्व जाती-धर्माना सोबत घेऊन राज्य करणाऱ्या लोकमाता होत्या, असंही हाजी मतीन बागवान यांनी यावेळी म्हटलं. 
या प्रसंगी मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, माजी महापौर आरीफ शेख, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि. विश्वनाथ गायकवाड, नगरसेवक हारुण शेख, राजू हुंडेकरी, कादर भागानगरी, बशीर सय्यद, हारिस शेख, रुस्तुम शेख, रियाज पैलवान, रिझवान दंडोती, लक्ष्मण भोसले, मुबीन बागवान, सरफराज काझी, गफूर चौधरी, कमर होटगी, कय्युम मोहोळकर, अफवान बागवान , हुजेर बागवान, अय्यान बागवान, खाशीम बेलीफ, सोहेल बागवान आदी उपस्थित होते.
