सोलापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूती विभागाच्या वतीने उपायुक्त आशिष लोकरे व आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुती विभागाच्या वतीने, शुक्रवारी, 30 मे रोजी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी, 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त्ताने परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी नियंत्रण अधिकारी स्पर्धेत भाग घेतलेले सर्व कर्मचारी यांचं काव्यवाचन व मार्गदर्शनपर भाषण झाले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचं बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. उषा जमादार, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुंधती हराळकर, नियंत्रण अधिकारी डॉ. ज्योत्स्ना कोरे, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे, स्त्रीरोग तज्ञ दिपीका चिंचोळी, वैद्यकीय अधिकारी शैलजा सरोदे, वैद्यकीय अधिकारी अनिल पवार, सर्व वैद्यकीय अधिकारी, मेट्रन संगीता लेकुरवाळे, मेट्रन संगीता गुरव, मिश्रक प्रदीप वेदपाठक, योगेश कांबळे, सुरेखा लोंढे, मेल मिडवाईफ, परिचारिका, आया, सफाई कामगार, रखवालदार- सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीने कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन योगेश कांबळे यांनी केले तर सिस्टर सुनिता ढगे यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.
