सोलापूर : एक लाखाची रोकड आणि या-ना-त्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून रक्कम घेऊन १ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झालीय. हा प्रकार २७ ते ०५ मे दरम्यान भावी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलाय. या फसलेल्या रोहिदास पांडुरंग मुळीक यांनी तक्रार दाखल केल्यावर एमआयडीसी पोलिसांनी प्रमुख तीन आरोपीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या आरोपींपैकी अशोक सामल यानं पोलीस असल्याची बतावणी करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली असल्याचेही सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील सासकल येथील रोहिदास मुळीक यांच्याकडून क्षितीजा क्षिरसागर हिच्या घरात संगणमत करून रोख फोन पे आणि मुलीला लग्नात घालण्यासाठी साडी खरेदीसाठी 18 हजार रुपये असे एकूण 1, 48, 000 रुपये घेतले.
दरम्यान झालेल्या बाचाबाचीत रोहिदासचा भाऊ दत्तात्रय याचा मोबाईल काढून घेतला व त्यातील व्हिडीओ शुटींग डिलीट केले. तसेच अशोक सामल यांनं पोलीस असल्याची बतावणी करुन मुळीक भावंडांना खोट्या गुन्ह्यात अडकवितो, म्हणून दमदाटी करुन हाताने मारहाण केली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी दशरथ चव्हाण, क्षिताजा क्षिरसागर, अशोक सामल आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोसई बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

