भारत गारमेंटच्या अध्यक्षपदी शफी इनामदार तर सचिवपदी गनी पठाण बिनविरोध

shivrajya patra

सोलापूर : येथील भारत सहकारी गारमेंट संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. बुधवारी, ३०एप्रिल रोजी निवडणूक अधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सन २०२५-३० कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून शफी इनामदार यांची तर सचिवपदी गनी पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या प्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांसह संचालक मकबुल मोहोळकर, मोहियोद्दीन मनियार, कय्युम इनामदार, मुकुंद शिंदे, वारीस कुडले, सलीम नदाफ, आयुब मोमीन, बबलू शेख, विजय जाधव, सफदर वळसंगकर, मुनाफ चौधरी, चांदसुलताना सय्यद, यास्मिन शेख, सलीम मुलाणी उपस्थित होते.

यावेळी सभासद इब्राहिम जमादार, सत्तार तुरूप, समीर शेख, निसार नदाफ यांनी नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी नूतन अध्यक्ष शफी इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभारी व्यवस्थापक शकील पिरजादे यांनी केले तर गनी पठाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

येत्या वर्षभरात किमान ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध करू : संचालक मंडळाचा निर्धार

येत्या वर्षभरात प्रकल्प सुरु करून सोलापूर आणि परिसरातील किमान ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार नूतन अध्यक्ष आणि संचालक मंडळाने व्यक्त केला.

To Top