यंदाच्या जिल्हा युवा पुरस्काराचे मानकरी प्रसाद खोबरे

shivrajya patra

सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत दरवर्षी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या युवकांना महाराष्ट्र द‍िनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो.

ज‍िल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणारे प्रसाद श्रीहरी खोबरे, शिक्षण : एम. एस. सी, पत्ता : 94/95 नवकल्याण नगर, रविवार पेठ, शेळगी, सोलापूर यांना जाहिर करण्यात आला आहे. 

खोबरे सन 2015 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत स्वपरिवर्तनातून समाज परिवर्तन या ध्येयाने समाजाप्रती असलेले उत्तर दायित्व पार पाडत आहेत.   समाजातील दुर्बल वंचित उपेक्षित घटक यांना वैदयकीय मदत करणे, गरजूंची गरज त्याच्या उपयोगासाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे,  झोपडपट्टी भागातील विदयार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करणे, दरवर्षी ऑगस्ट महिन्यात महिलांची वैद्यकीय तपासणी शिबीर राबविणे, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिती आपत्ती व्यवस्थापनात मदत कार्य करणे, यासारख्या  सामाजिक क्षेत्रातील कार्याचा मूल्यमांपन करुन त्यांना सन 2024-25 जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येत असल्याचे ज‍िल्हा क्रीडा अध‍िकारी नरेंद्र पवार यांनी प्रस‍िध्दी पत्रकान्वये कळव‍िले आहे.

पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व रोख बक्षिस 10,000 रुपये असं असल्याचे पत्रकात नमूद आहे.

To Top