जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांना अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समतावादी विचार जनमानसात रुजवणारे महान तत्त्ववेत्ते, थोर समाजसुधारक, जगद्ज्योती, श्री संत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवारातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अप्पासाहेब लंगोटे  मित्रपरिवार दैनिक शिव निर्णय वृत्तपत्राचे संपादक अनिल शिराळकर, नितीन करजोळे, माहिती अधिकार कार्यकर्ता सिद्धाराम नंदरगी, ज्येष्ठ पत्रकार वैजनाथ बिराजदार, साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ढोणे, गिरमल गुरव, ज्येष्ठ पत्रकार लतीफ नदाफ, मुस्ताक शेतसंदी, पत्रकार अकबर शेख, मिलिंद प्रक्षाळे,भारत केदार, वाघमारे मामा आदी उपस्थित होते. 

यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या अद्वितीय विचारांनी आणि समाजसुधारणेच्या कार्याने संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. 'अनुभव मंटप'च्या माध्यमातून त्यांनी समानता, बंधुत्व आणि न्याय यांचे महान तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या विचारांचा आपण आपल्या जीवनात अंगीकार करून समाजात समतेचा आणि न्यायाचा प्रकाश पसरवू या, असा संकल्प मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.

To Top