सोलापूर : येथील नई जिंदगी अपना नगरातील रहिवासी सैफन बाशासाब जमादार यांचं वृध्दापकाळात बुधवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचं मूळ गांव अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा असून ते मृत्यूसमयी ७९ वर्षीय होते.
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी सात वाजता राहत्या घरापासून निघून सात रस्ता येथील मोदी मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांचा दफनविधी (सुपूर्द-ए-खाक़) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते सोलापूर आरटीओ कार्यालयातील लिपिक महिबूब जमादार यांचे वडील होत.
