राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने महामानव डॉ. आंबेडकरांना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब तथा भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या भव्य पुतळ्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखा सोलापूरचे विजयकुमार भांगे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण पुतले यांच्या हस्ते पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आय. टी. आय. सोलापूर जिल्हा गट निदेशक संघटनेचे शिरीष शेळके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे राजा सोनकांबळे, हुसेनबाशा मुजावर, सटवाजी होटकर, संतोष भंडारे, प्रकाश चव्हाण, अशोक नागरगोजे, भीमराव लोखंडे, शशिकांत भालेराव, नामदेवराव थोरात, आर. जे. शिंदे, सुनील बोलाबत्तीन, आशुतोष नाटकर, प्रभाकर माने, वैशाली जेधे मॅडम, समीर हुडेवाले, फिरोज मुलाणी, प्रवीण वाघमारे, आरिफ रंगरेज, प्रभाकर होनकळस यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शहर-जिल्हा सोलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच रा.स.क.म. संघटनेमधील सर्व खातेनिहाय संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top