डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी 47 रक्तदात्यांचं करून अभिवादन; डॉ. कोटणीस फाऊंडेशनचा उपक्रम

shivrajya patra

सोलापूर : महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेडिकल व सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

'ब्लड फॉर बाबासाहेब' या संकल्पनेतून डॉ. द्वारकानाथ कोटणीस मेडिकल व सोशल फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सागर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन  केले जाते. यंदाचे हे 09 वं वर्ष होतं. 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, ज्येष्ठ नेते भारत जाधव, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुरेश पाटोळे, युवा नेते सुशील सरवदे, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, चित्रा कदम, सायरा शेख, अरुणा बेंजारपे, अजित पात्रे, प्रवीण वाडे, रुपेश गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष निशांत सावळे, प्रशांत गायकवाड, सुमीत वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पद्मसिंह शिंदे, आकाश बाळलोली, जनक पारवे, पांडुरंग बनसोडे, ओम माळवे, अजित पवार आदींनी परिश्रम घेतले.

To Top