क्षयरोग विभागाच्या डॉ. बनसोडे यांच्या मनमानीविरूध्द कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आरोग्य मंत्र्यांकडं निवेदन

shivrajya patra

सोलापूर : मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर संबंध आरोग्य यंत्रणेकडे संशयाने बघितलं जातंय. अशातच येथील सोलापूर सिव्हिलमधील क्षयरोग विभागातील सावळा गोंधळ जनसामान्यांसमोर आलाय. या विभागाच्या प्रमुखांकडून मनमानी सुरु असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी यासंबंधानं निवेदन दिलं आहे.

सोलापूर सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम विभाग कार्यरत आहे. मात्र या विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. श्रीमती मीनाक्षी बनसोडे या स्वतःची मनमानी करतायेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या नाहक त्रास देतात. क्षयरोग विभागाऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वतःची घरची कामे करायला भाग पाडतात. यांची घरची कामे न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे किंवा ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. त्यामुळे घरकामासह गाडी धुणे, किराणा-भाजीपाला आणणे, लॉन्ड्री चे कपडे आणणे, नातेवाईकांचाकर्मचाऱ्यांना  पाहुणचार करणे अशी कामे करावी लागत असल्याचा या कर्मचाऱ्यांना आरोप आहे.

डॉ. मीनाक्षी बनसोडे या सोलापूर सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावतात. न वागल्यास त्यांना नाहक कामाच्या ठिकाणी चुकीचा त्रास देतात. येथील खाजगी कर्मचाऱ्यांनी या विभागाला मोठ्या कष्टाने राज्यात मानाचे स्थान मिळवून दिलं, मात्र बनसोडे या कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते अडवून त्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्र्याकडे दाद मागितलीय.

To Top