सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसीत भारताचे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न आहे. त्याप्रमाणे आमचे विकसीत सोलापूर जिल्हा असे स्वप्न आहे. लोकमंगलच्या माध्यमातून आम्ही हे साकार करण्याचा प्रयत्न आहे. त्याला मित्र या शासन नियंत्रणाखाली असलेल्या संस्थेने साथ द्यावी, त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे केली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे लोकमंगलच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रविणसिंह परदेशी प्रमुख म्हणून उपस्थित होते. सुरूवातीला मुख्यमंत्र्याचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल आ. देशमुख यांनी परदेशी यांचा सत्कार केला.
यावेळी आ. देशमुख यांनी लोकमंगल समूहाच्यावतीने लोकसहभागातून गाव समृद्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मित्र या शासन नियंत्रणाखाली असलेल्या संस्थेने लोकमंगलशी टायप व्हावे, त्यातून समृद्ध गाव अभियानात सहभाग नोंदवावे, याशिवाय दूध व्यावसाय वाढवणे, जिल्ह्यात वृक्षारोण करणे यासाठी शासनाकडून सहकार्य करावे, आदी मागण्या केल्या. 
यावेळी लोकमंगल बँकेचे सीईओ राजेशसिंह बायस, संचालक देवानंद चिलवंत, प्रल्हाद कांबळे, जितेंद्र लाड, नरेंद्र काटीकर अनंत चव्हाण, सिद्धार्थ सर्जे, पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर, पाथरीचे सरपंच संजय वाघमोडे, अनिता ढोबळे आदी उपस्थित होते.
...चौकट
विकसीत शहरात आयटी कपंनी आणण्यासाठी विजेची सर्वात जास्त गरज आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून आपण एक ट्रिलियन विजेचा वापर करून आय.टी. कंपनी आणण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय आ. सुभाष देशमुख यांच्या मागण्यांवर निश्चितच विचार करू.
प्रविणसिंह परदेशी, आर्थिक सल्लागार
