सोलापूर : माजी महापौर दिवंगत मुरलीधर तुळशीराम पात्रे यांच्या पत्नी श्रीमती मंगल पात्रे यांचं सोमवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी त्या 72 वर्षाच्या होत्या.
त्यांची अंत्ययात्रा, मंगळवारी, २९ एप्रिल रोजी दुपारी न्यू बुधवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. कारंबा नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या पत्रकार नितीन पात्रे यांच्या मातोश्री होत.
