सोलापूर : जमावबंदी आदेशाचा अंमल सुरू असताना विनापरवानगी आंदोलन करून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ओंकार राजेश चव्हाण याच्यासह अन्य आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार गुरुवारी, १० एप्रिल रोजी दुपारी 13.30 वा. सुमारास चार हुतात्मा पुतळा चौकात घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने, पोलीस निरीक्षक दराडे (गुन्हे) पोलीस उप निरीक्षक पाटोळे, सहाय्यक फौजदार भालशंकर यांनी घटनास्थळाला भेट दिलीय.
सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडील विशेष शाखेच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत 30 मार्च रोजी 00.01 ते दि. 13 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री 24.00 वा. पर्यंत सोलापूर शहर हद्दीत सार्वजनिक रितीने घोषणा देणे, 05 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवाना एकत्रित येणेस, सभा घेणेस मनाई आदेश पारित केला आहे.
या काळात, १० एप्रिल रोजी दुपारी ओंकार चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने वक्फ बीलासंबंधी घेतलेल्या पक्षीय भूमिकेचा निषेध करण्यासाठी ओंकार चव्हाण चार हुतात्मा पुतळा चौकात एकत्र येऊन "मुर्दाबाद, मुर्दाबाद उध्दव ठाकरे मुर्दाबाद" असे म्हणून उध्दव ठाकरे यांचा कागदी फोटो फाडला. उध्दव ठाकरे यांनी संसदेत मंजूर झालेल्या वक्फ बोर्ड बिल विरोधात वक्तव्य केले, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ते एकत्र आले होते.
या जमावाने मनाई आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवानगी निषेध आंदोलन केल्याप्रकरणी पो.कॉ. प्रविण भोसले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार ओंकार राजेश चव्हाण, विशाल पवार, अभिषेक चव्हाण, सोनु चव्हाण आणि अन्य 02-03 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 चे कलम 37 (1), (3) /135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सहाय्यक फौजदार भालशंकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
.jpeg)