भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडचे अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेड च्या वतीने 14 एप्रिल च्या रात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने, शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे, शहर सचिव सिद्धाराम सवळे, शहर संघटक सतीश वावरे, शहर संघटक शेखर कंटेकर, दिलीप निंबाळकर, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे, राहुल बनसोडे, सिद्धार्थ राजगुरू आदी उपस्थित होते.

To Top