महात्मा फुले यांनी हिंदू धर्माची कठोर चिकीत्सा केली : प्राचार्य नागोराव कुंभार

shivrajya patra

लातूर : कुठल्याही विद्यापिठाची पदवी न घेता केवळ तर्क आणि अनुभवाच्या जोरावर महात्मा ज्योतीराव फुले यांनी सनातन हिंदू धर्माची कठोर चिकीत्सा केली. हिंदू धर्मात असलेले पुनर्जन्माचे तत्वज्ञान खोटे असल्याचे सिद्ध करून वर्णव्यवस्था मानवी जीवनासाठी कलंकीत असल्याचे सांगून सत्याचा शोध घेणारा सत्यशोधक विचार दिला. त्यामुळेच प्रकांड पंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीराव फुल्यांना आपले गुरू मानतात, असे प्रतिपादन विचार शलाकाचे संपादक तथा विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार यांनी केले.

लातूर येथील ' जी-24 ' या सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या पुतळ्याला प्राचार्य कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

' फुले -आंबेडकर - बसवण्णा जयंती सार्वजनिक समिती लातूर ' चे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मकबूल वलांडीकर यांचीही यावेळी समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरसिंग घोडके यांनी केले तर भारत काळे यांनी आभार मानले. 

यावेळी सर्वश्री प्रा. कल्याण कांबळे, हरी गायकवाड, प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, यु. डी. गायकवाड, लक्ष्मण दावणकर, अॅड. वसंतराव उगीले, डॉ. गणेश गोमारे, गणेश रेकुळवाड, श्रीधर शेवाळे, डी. एन. सूर्यवंशी, डी. उमाकांत, शिरीष दिवेकर, श्रीमती महानंदा शेवाळे आदि मान्यवरांसह महिला-पुरुष मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

To Top