छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन; शासकीय कार्यालयांना नाही शासनाचं परिपत्रक

shivrajya patra

सोलापूर :  स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला.

जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला नाही, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना विचारले असता, शासकीय जीआर मध्ये तसा उल्लेख नसल्या कारणाने आम्ही अभिवादन केलं नाही, तरी आम्ही दुपारी चार वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करू, असे सांगण्यात आले.

अनेक शासकीय कार्यालयामध्ये व निमशासकीय कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आलं नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता  संजीव ठाकूर यांच्याकडं विचारणा केल्यानंतर सिव्हिल प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम यांनी सांगितले.

यावेळी विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, लखन पारसे, अकबर शेख, संघटक शेखर स्वामी, राजेंद्र माने, उपाध्यक्ष सतीश वावरे, चंद्रशेखर कंटीकर, सिद्धाराम सावळे, वीरेश कंटीकर, बबन डिंगणे आदी उपस्थित होते.

To Top