... तर पुस्तके वाचून बाबासाहेबांची जयंती साजरी; आर्यन्स बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचा उपक्रम

shivrajya patra

सोलापूर : बाबासाहेबांची जयंती आनंदाचा उत्सव आहे, त्यात सर्वजणच नाचतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या संदेशाप्रमाणे युवकांनी शिकून, पुस्तके वाचून जयंती साजरी करावी, या उद्देशाने पुस्तके व ग्रंथ वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला, असं संस्थेचे संस्थापक अमितकुमार अजनाळकर यांनी सांगितले. 

प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील झाल्यानंतर पुस्तक वाचनाचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर इरम शेख व सिद्धार्थ सोनवणे या शाळकरी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र भाषणातून श्रोत्यांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक तौफिक शेख होते. 

आर्यन्स बहुउद्देशिय सामाजिक संस्थेतर्फे अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राज्य उपाध्यक्ष अहमद शेख, मुजावर जमातचे राज्य उपाध्यक्ष सिकंदर मुजावर, BRS चे अल्पसंख्यांक अध्यक्ष मोहसीन शेख, किर्तीपाल शिवशरण, साजिद शेख, विशाल बसवा आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

तौफिक शेख यांनी बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे संविधानरुपी कार्य संपूर्ण भारताला कशा प्रकारे बळकटी देऊन सर्व जाती-धर्मांना एकत्रित ठेवण्याचे काम करीत आहे, हे थोडक्यात सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय गायकवाड, सलमान कंपली, आकाश आहेरकर, दिनेश काकी, सागर दिंडोरे, सदरोद्दीन पिरजादे, विकास केंचूगुंडी, इराण जमादार, बाळासाहेब सरवदे, श्रेयस विटकर, इरम शेख, आयेशा शेख, राधा कांबळे, स्नेहल भरले, प्राजक्ता रिकीबे, अल्फिया शेख आदींनी परिश्रम घेतले. 

To Top