सोलापूर : औद्योगिक शाळेतील सुमारे पाऊणे दोन लाख रुपयांचं साहित्य चोरी गेले. ही घटना २३ ते २६ डिसेंबर २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी ९५ दिवसांनंतर फिर्याद दाखल केल्यावर सदर बझार पोलिसांकडं अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी नॉर्थकोट प्रशाला प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळेच्या विविध विभागामधील १,७५,९९८ रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यानं चोरून नेले.
त्यात लेथ मशीन, कुलेंट पंप, व्हाईस स्वीवेल बेस, वेल्डींग ट्रान्सफॉर्मर, जी.डी. वेलर लेथ मशिन, टुल किट, वेल्डीग टॉर्च, सिटीलीन रेग्युलेटर, ऑक्सीजन रेग्युलेटर, गॅस वेल्डीग ब्लो पाईप, कटर, टॉर्च प्रेशर रेग्युलेटर टेकॉमिटर, स्लिप रिंग इंडक्शन इलेक्ट्रीक इस्त्री वायर बंडल या साहित्याचा समावेश आहे. हे सर्व साहित्य केवळ तीन दिवसांदरम्यान चोरीस गेले, मात्र मुख्याध्यापक अमर किशोर जाधव यांनी ९५ दिवसांनंतर फिर्याद दाखल केली.
याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.न्या. संहिता कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक साखरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
.jpeg)