सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात सप्ताहभर विविध कार्यक्रमाचे,विविध स्पर्धेचे, व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. आंबेडकर अनुयायी नाविन्यपूर्ण गोष्टीची, वस्तूंची खरेदी करतात. तत्पूर्वी वेतन झाल्यास आंबेडकर अनुयायांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांचे वेतन शाळा वेतन 14 एप्रिलपर्यंत करण्याची मागणी बहुजन शिक्षक महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडं केलीय.
आपापल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन कपडे खरेदी करण्याकडं प्रत्येकाचा कल असत. या उत्सव काळात सर्व कार्यक्रमासाठी, स्पर्धांसाठी, ग्रंथ खरेदीसाठी पैशाची गरज असते. नेमके अर्थसंकल्पामुळे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन उशिरा होते.
दरवर्षी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील सर्वच शाळा महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन 14 एप्रिल पूर्वी करण्याची विनंती करण्यात येते. शासन, प्रशासन या विनंतीला मान देऊन 14 एप्रिल पर्यंत वेतन करण्याचा प्रयत्न करतात.
यावर्षीही जिल्ह्यातील सर्वच शाळा महाविद्यालयाचे वेतन 14 एप्रिलपर्यंत करण्याची विनंती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडं करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.
या निवेदनावर राज्य अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले, महिला प्रतिनिधी निर्मला मौळे यांच्या सह्या आहेत.
शिष्टमंडळामध्ये राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर, महिला संघटक निर्मला मौळे, मुख्याध्यापक अविनाश भालशंकर, दीपक दुधनकर, मनोज भुरले, भीमराव माने इत्यादींचा समावेश होता.