सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर मॉडेल करियर सेंटर, व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी गुरुवारी, 20 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी दिली.
जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीय, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम. कॉम, अशा प्रकारची एकुण 350 पेक्षा जास्त रिक्तपदे 16 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी बायोडेटांच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह 20 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे.