(प्रतिकात्मक नकाशा)
सोलापूर : शासनाने ठरवून दिलेल्या 100 दिवसांतील उपक्रमांतर्गत सोलापूर शहर नगर भूमापन अधिकारी, सोलापूर यांचेकडील हद्दीतील मिळकतींकरीता शंका समाधान व माहिती देणे हा कार्यक्रम शुक्रवारी, 28 मार्च रोजी प्रशासकीय इमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नगर भूमापन कार्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे.
या करीता लष्कर, निमलष्कर, सी.आर.पी.एफ, पोलीस व होमगार्ड इत्यादी सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे शंका समाधान व माहिती देणे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भूमापन अधिकारी गजानन पोळ यांनी दिली आहे.
तरी सोलापूर शहर भूमापन हद्दीतील उपरोक्त विभागातील संबंधीतांनी 28 मार्च रोजी दुपारी 4.00 ते सायंकाळी 6.00 च्या दरम्यान कार्यालयामध्ये येऊन सदर उपक्रमाचा लाभ घेण्यात यावा.
यावेळी येत असताना संबंधीतांनी आपले ओळखपत्र सोबत आणावे, या उपक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे वैयक्तीक व स्वत: चे मिळकतीच्या माहितीबाबत स्वत: उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर नगर भूमापन अधिकारी पोळ यांनी केलं आहे.
.jpeg)