महानगरपालिका व सा. बां. वि. कडील भ्रष्ट अधिकारी-ठेकेदारांवर व्हावेत गुन्हे दाखल :उपोषणास प्रारंभ

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून सन 2021 व 24 या कालावधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्या निषेधार्थ आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विश्वभूषण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाची सुरुवात करण्यात आलीय.

1) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन 2021 व 2024 या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपये दुसरीकडे वळवणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाला पाहिजे. 

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून सन 2021 व 2024 या कालावधीमध्ये प्रशासकीय मंजुरी घेऊन कोट्यावधी रुपयाचे निष्कृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

3) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना, महापालिका क्षेत्रातील  मूलभूत सुविधा विकास विशेष तरतूद योजने, अल्पसंख्यांक बहु नागरिक क्षेत्रातील विकास कार्यक्रम योजना, विशेष अर्थसहाय्य योजना, नागरी वस्ती सुधारणा योजना, समाज कल्याण कार्यालय यांच्या सण 2021 ते 2024 या कालावधी  योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयाचे झालेल्या कामाचे पाहणी करून आदा केलेले बिल वसूल करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे व नव्याने काम चालू करण्यात यावे.

4) मुकुंद नगर मधील सार्वजनिक शौचालयाचे 8,41,818 रुपयाचे काम निष्कृष्ट दर्जाचे करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पूर्ण बिल वसूल करण्यात करून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे.

5) वरील सर्व योजना अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्याकडून कोट्यावधी रुपयाच्या चालू असलेले कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांचे सखोल चौकशी करून कामाची पाहणी करून बिल अदा करण्यात आलेल्या मक्तेदाराचे बिल वसूल करून मक्तेदाराला कायमचा ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या आहेत.

या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आमरन उपोषण माघार घेतलं जाणार नाही, असा इशारा आर बी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

To Top