बागबान जमियत ट्रस्ट यांच्या वतीने नबीलाल बागवान यांना आर्थिक मदत

shivrajya patra

सोलापूर : येथील व्यावसायिक नबीलाल बागवान यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमुळं तब्बल 22 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा माल जळून भस्मसात झाला होता. या दुर्घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर-जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट ची टीम घटनास्थळी पोहोचली. या टीमने नबीलाल बागवान यांना धीर देत, बागबान जमियत ट्रस्टकडून नबीलाल बागवान यांना 25 हजार रुपयांची आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.

बुधवारी, १९ मार्च रोजी नबीलाल बागवान गोडाऊनमध्ये ०८ महिला गोडाऊनमध्ये काम होत्या, त्यावेळी अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यात गोडाऊनमध्ये असलेले सगळं वेस्टेज मटेरियल जळून खाक झाले, लाखो रुपयांचं नुकसान झाले.

नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता, रमजान महिन्यामध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे, म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी, असे आवाहन बागवान जमियतचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले.

या टीमने नबीलाल बागवान यांना धीर देत, बागबान जमियत ट्रस्टकडून नबीलाल बागवान यांना 25 हजार रुपयांची आर्थिक स्वरूपात मदत केली. याप्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान, सेक्रेटरी हाजी इलियास बागवान, जॉईन्ट सेक्रेटरी आबिद बागवान, शोएब चौधरी, आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते.

ज्यांना नबीलाल बागवान यांना मदत करायची मनोमन इच्छा आहे, अशा  समाजातील दानशूर मंडळींनी नबीलाल बागवान यांचा स्कॅनर  बागबान जमियत ट्रस्टकडून मागवून घ्यावा, असं आवाहन जुबेर बागवान यांनी या दुर्घटनेच्या निमित्तानं केलंय.

To Top