पंढरपुरात पांचाळ सोनार समाजाचे राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

shivrajya patra

पंढरपूर : येथील पांचाळ सोनार समाज यांच्या सौजन्याने ह्या वर्षी पांचाळ सोनार समाज राज्यस्तरीय वधू-वर मेळावा रविवारी, १६ मार्च रोजी येथील फरताळे दिंडी क्र. ०९,भक्ती मार्ग, संत गाडगेबाबा चौक, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे मार्गदर्शक वेदाध्यायी सदानंद महामुनी(भटजी) व मेळाव्याचे आयोजक केशव महामुनी(भटजी) हे असून स्वागताअध्यक्ष सुमित पारखे , उपाध्यक्ष विशाल दिक्षित आहेत. 

त्याचबरोबर मेळावा यशस्वी होण्याकरिता लाभलेले संयोजक विजय कासेगांवकर, सारंग महामुनी, शशिकांत पोतदार(सर), स्वप्नील कमसल (वेदपाठक), संजय वेदपाठक, बसवराज पोतदार, रमेश महामुनी, मनोज कासेगावकर आदी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. सर्व समाज बांधव व भगिनींनी आपल्या पाल्यासाठी सुयोग्य स्थळ ठरवून जीवन व संसार फुलावा, या भावनेने मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे.

To Top