सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पत्रकार बांधवांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, पत्रकार विश्वास गायकवाड, दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड, ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, नियोजीत शाक्य संघाचे महाराष्ट्र संघटक अशोक दिलपाक, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र माने, महामानव सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूरचे ऋषिकेश माळशिखरे, सिद्धेश्वर भुरले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.