सोलापूर : ब्राह्मणांच्या ताब्यातून गया महाबोधी महाविहार काढून बौद्धांकडे सुपूर्द करण्याच्या समर्थनासह अन्य प्रमुख मागण्यांवर मंथन करण्याच्या उद्देशानं बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, ०१ एप्रिल रोजी फॉरेस्ट परिसरातील चांदणी चौकात विशाल जनसभा आयोजन करण्यात आलं आहे.
देशातील निवडणुकीमध्ये इ.व्ही.एम. मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, ओबीसीं ची जाती आधारित जनगणना करण्याच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पीच्छडा वर्ग मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभाण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून चांदणी चौकात जनसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी ०६ वा. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सभेचं उद्घाटन होईल, असं संयोजक अॅड. शिदगणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलं आहे..jpg)
बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने 09 एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आलीय, त्याच्या तयारी अंतर्गत RSS आणि BJP च्या माध्यमातून मूलनिवासी बहुजन समाजातील महापुरुषाच्या अपमान करणाऱ्यांचा विरोध, महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून बोद्धाकडे सुपूर्द करण्याच्या समर्थनात जनमत उभं करण्यासाठी विविध ज्वलंत विषयांवर चर्चा होणार आहे.
या सभेचे उद्घाटन माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सभेला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याचे संयोजक भारत मुक्ती मोर्चाचे ॲड. योगेश शिदगणे यांनी म्हटले आहे.
