सभापती प्रा. राम शिंदे जिल्हा दौऱ्यावर

shivrajya patra

सोलापूर : सभापती विधानपरिषद प्रा. राम शिंदे  हे शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

पहाटे 04.40 वा. जेऊर रेल्वेस्टेशन येथे आगमन व शासकीय मोटारीने करमाळा ,शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  सकाळी 07.45 वा शासकीय वाहनाने मुथानगर करमाळा कडे प्रयाण. सकाळी 08.00 वाजता  मुथानगर येथे आगमन व श्री हरिष कडू यांचे निवासस्थानी राखीव.  सकाळी 08.30 वा. शासकीय वाहनाने पोथरे ता . करमाळा कडे प्रयाण. सकाळी 08.40 वा. पोथरे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती व शनिमंदिर येथे दर्शन.

सकाळी 09.30 वा. पोथरे येथून शासकीय वाहनाने खातगांव ता. करमाळा कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. रणसिंग फार्म (उजनी परिसर) खातगांव येथे आगमन व ग्रामसुधार समिती करमाळा आयोजित बालाजी मंजुळे यांच्या करमाळा भूषण पुरस्कार व राजेंद्र रणसिंग यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. खातगांव ता. करमाळा येथून शासकीय वाहनाने जामखेड तालुक्यातील चौंडी  (जिल्हा-अहिल्यानगर) कडे प्रयाण करतील, असं जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

To Top