अबुबकर बागबान यांचं निधन
सोलापूर : येथील बेगम पेठ परिसरातील रहिवाशी तथा जुन्या काळातील कप-बशीचे व्यापारी अबुबकर बागबान यांचं सोमवारी, १७ मार्च रोजी दुपारी वार्धक्यात निधन झाले. ते मृत्यू समयी ८५ वर्षीय होते. ते कप-बशीवाले या उपाख्य नावाने सर्व परिचीत होते.
रात्री नमाज तरावीहनंतर चिराग अली कब्रस्तान येथे दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. ते उर्दूचे पत्रकार व ऑर्चिड इंजि. कॉलेज चे क्लार्क इक्बाल बागबान यांचे वडिल होतं.