राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षिस योजना राबविण्यात येते. सदर कापड स्पर्धेकरीता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपारीक व अपारंपारीक डिझाईनच्या अतिउत्कृष्ट नाविण्यपुर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शीत वाणामधून निवड करुन उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षिस देवून हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषगाने पारंपारीक व अपारंपारीक वाणाचे कापड उत्पादन करणाऱ्या विणकरांकरीता सन 2016-17 पासून विभागीय स्तरावर विभागीय हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
शासनाने दिनांक 17 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयान्वये ही स्पर्धा विभागीय हातमाग कापड स्पर्धा असे नामकरण करुन, विभागीय स्तरावर आयोजित करण्याचे निश्चित केलेली आहे. प्रादेशिक उपआयुक्त वस्रोद्योग, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग कापड स्पर्धा पार पाडण्यात आली.
विभागीय हातमाग कापड स्पर्धामध्ये सादर केलेल्या वाणाचे शासनाने नियुक्त केलेल्या निवड समितीने विणकरानी उत्पादित केलेला वाणाचे अत्युत्कृष्ट, कलात्मक, नाविन्यपूर्ण, रंगसंगतीयुक्त आणि कलाकौशल्य पूर्ण असलेल्या वाणाची निवड करुन काशिनाथ महादेव सातलगांव व विठोबा तिपण्णा मोने या विणकरांना प्रथम पारितोषीक (विभागून), अशोक सुरेश टिपरे, श्रीनिवास इरण्णा मोने, राजेंद्र अंकम, सौ. सुजाता सोमा यांना द्वितीय पारितोषीक (विभागून) व सौ. अश्विनी नदाल, महेश सुंचू, श्रीधर कटकूर, शरणप्पा म्हेत्रे, लाडप्पा मड्डे यांना तृतिय (विभागून) असे एकूण 11 स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस पात्र धनादेशाचे वितरण करण्यात आलं.
विभागीय हातमाग कापड स्पर्धा निवड समितीत विभागीय आयुक्त (महसूल) पुणे हे अध्यक्ष असून, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक विणकर सेवा केंद्र मुंबई, सहाय्यक आयुक्त, सोलापूर हे सदस्य असून प्रादेशिक उपआयुक्त वस्रोद्योग, सोलापुर आहेत सदर विभागीय कापड स्पर्धाचे आयोजन, तहसिलदार (करमणूक शुल्क) सोलापूर श्रीमती शिल्पा ओसवाल यांचे अध्यक्षतेखाली व प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि. सोलापूर कुंदन भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर व विणकर सेवा केंद्र, मुंबई या कार्यालयाच्या वतीने वी. एस. यादव, मनिष पौनिकर, तांत्रिक सहाय्यक ए.सी कोकल, व सहाय्यक उपआयुक्त् निलेश निखाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक अधिकारी ए. एम. गोरे यांनी केले.
