हत्तूर येथील सोमेश्वर-बनसिध्देश्वर मंदिरासाठी 03 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर

shivrajya patra
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिर देवस्थानच्या करण्यात येणार्‍या विविध विकासकामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुभाष देशमुख यांनी या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. नुकतेच त्यांनी यासाठी ग्रामविकासमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निधीची मागणी केली होती. अखेर त्याला यश आले आहे.

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हत्तुर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर मंदिरास तीथक्षेत्र ब दर्जा प्राप्त झाला होता. आ. देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना या सुशोभिकरणाचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. या ठिकाणी भक्तनिवासासह विविध विकासकामांसाठी आ. सुभाष देशमुख यांनी 5 कोटींची मागणी केली होती. याबाबत 24 मार्च रोजी ग्रामविकासमंत्र्यासोबत बैठक घेतली होती. 

ग्रामविकास विभाागाने यासाठी 3 कोटी 76 लाखांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 75 लाखांचा निधी वितरीतही करण्यात आला आहे. या निधीमधून  महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र भक्त निवास बांधणे, सार्वजनिक शौचालय, स्नानगृह बांधणे, पाणी पुरवठा करणे, वाहनतळ बांधणे यासह परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. निधी मंजूर करून घेतल्याने ग्रामस्थांनी आ. देशमुख यांचं आभार मानले आहेत.

... चौकट 

मंदिर राज्यात नावारूपाला आणणारः आ. देशमुख

ग्रामस्थांना मी शब्द दिला होता, तो पूर्ण केला आहे. आगामी काळात मंदिराच्या सुशोभीकरणासाठी व तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने मंदिर राज्यात नावारूपाला येण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

To Top